मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 महाराष्ट्र मराठी : अर्ज ऑनलाइन, पात्रता, अनुदान..
राज्यातील शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरावी, शाश्वत व्हावी तसेच राज्यातील शेतकरी संपन्न आणि सुखी व्हावा असे महाराष्ट्र शासनाचे उद्दिष्ट आहे, यासाठी महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना, धोरणे नियोजनबद्ध पद्धतीने राबवीत असते, याच धोरणाचा अवलंब करून शेततळे योजना, सौर कृषी पंप योजना या सारख्या योजना शासन राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून या योजनांची अंमलबजावणी करत आहे. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप आस्थापित करण्याची योजना जाहीर केली आहे, सौर उर्जा हा उर्जेचा शाश्वत आणि अखंड स्त्रोत आहे, भारतासारख्या देशामध्ये आठ महिने कडक उन असते, त्यामुळे निसर्गाकडून मिळालेल्या या निरंतर उर्जेच्या स्त्रोताचा वापर सौर कृषी पंपच्या माध्यमातून वापरून शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायद्याचा ठरू शकतो.
त्याचप्रमाणे पारंपारिक उर्जेचे स्त्रोत निसर्गामध्ये अल्प प्रमाणात उपलब्ध आहेत, तसेच त्यांचा अत्यंत वापर झाल्यामुळे निसर्गामध्ये असमतोल निर्माण झाला आहे, शेतीसाठी पाण्याचे अत्यंत महत्व आहे आणि ते मिळवण्यासाठी विजेची गरज असते, हि वीज जर अपारंपरिक उर्जा स्त्रोतातून म्हणजे सौर उर्जेतून मिळविण्यात आली तर हे शेतकऱ्यांच्या अत्यंत फायद्याचे आहे, तसेच यामुळे निसर्गाचा समतोल सुद्धा साधल्या जाईल. वाचक मित्रहो या लेखामध्ये आपण महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 विषयी संपूर्ण माहिती जसे या योजनेच्या अंतर्गत अनुदान किती मिळणार, त्यासाठी पात्रता काय आहे, आवश्यक कागदपत्र इत्यादी माहिती पाहणार आहोत.
महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना या योजनेची अंमलबजावणी शासनाव्दारे राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केली आहे, तसेच शेतकरी वापरत असलेले पारंपारिक विजेवर चालणारे कृषी पंपांना पुरवठा होत असलेल्या विद्युत पुरवठ्यामध्ये वारंवार बिघाड होऊन वीज पुरवठा खंडित होणे, तांत्रिक वीज हानी वाढणे, रोहोत्र बिघाड होण्यामध्ये वाढ, विद्युत अपघात, विद्युत चोरी या सारख्या समस्यांमुळे अखंडित व शाश्वत विद्युत पुरवठा होण्यास अडचणी निर्माण होतात, या शिवाय जिथे विद्युत पुरवठा उपलब्ध नाही अशा ठिकाणी शेतकरी डिझेल इंधनाचा वापर करून कृषी पंप चालवितात जे त्यांना डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे अत्यंत महागात पडते, पर्यायाने या सर्व समस्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होते, याला पर्याय म्हणजे सौर कृषी पंप राज्यातील शेतकऱ्यांना सौर कृषी पंप उपलब्ध करून दिल्यास वरील सर्व समस्यांवर मात करता येऊ शकते. यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2022 मोठ्याप्रमाणात राबविण्याचा शासनाचा विचार आहे.
.मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत महाराष्ट्र सरकार सौर कृषी पंपाच्या किंमतीच्या 95 टक्के अनुदान देणार आहे आणि यामध्ये लाभार्थ्यांना 5 टक्के रक्कम भरावयाची आहे.
- या योजने अंतर्गत 5 एकरपर्यंत शेतजमीन असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना 3 HP पंप देण्यात येतील आणि 5 एकर पेक्षा अधिक शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना 5 HP आणि 7.5 HP पंप देण्यात येतील.
- मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनेचं अंतर्गत राज्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल.
योजनेचे नाव मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र व्दारा सुरुवात महाराष्ट्र शासन राज्य महाराष्ट्र लाभार्थी महाराष्ट्र राज्याचे शेतकरी उद्देश्य राज्याच्या शेतकऱ्यांना सोलर पंप उपलब्ध करून देणे अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन अधिकृत वेबसाईट https://www mahadiscom.in/solar विभाग MSEDCL
No comments:
Post a Comment