जत्रा शासकीय योजनांची सर्वसामान्यांच्या
विकासाची या अभियाना अंतर्गत
महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये 75000 लाभार्थींना विविध योजनांचा लाभ दिला जाणार आहे शासन
नागरिकांसाठी विविध योजना राबविते या योजनांची अंमलबजावणी करिता विविध दरवर्षीच्या
अर्थसंकल्पामध्ये आर्थिक तरतूद केली जाते. सदर योजनांची विविध स्तरावरती प्रसिद्ध
केली जाते. परंतु नागरिकांना योजनेचा लाभ घेण्यासाठी शासकीय शासकीय कार्यालयामध्ये
जावे लागते त्या ठिकाणी जाऊन माहिती घेणे त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे गोळा
करणे जुळविणे तसेच सर्व कागदपत्रे कार्यालयात जमा करणे त्यामध्ये काही त्रुटी
असल्यास ती दूर करणे यामध्ये वारंवार नागरिकांना कार्यालयांमध्ये जावे लागत , यामुळे योजनेचा उद्देश सफल होत नाही .
महाराष्ट्र
राज्यामध्ये जिल्हा प्रशासनाकडून व लोकप्रतिनिधींकडून यापूर्वी जामनेर चाळीसगाव
मुरबाड व कल्याण ठिकाणी हे जत्र शासकीय योजनांची सर्वसामान्यांच्या विकासाची हे
अभियान राबविले होते या उपक्रमामध्ये कमीत कमी कालावधीमध्ये नागरिकांना योजनेचा
लाभ देण्यात आला आहे.
अभियानाचे नाव |
जत्रा शासकीय योजनांची- सर्वसामान्यांच्या
विकासाची |
विस्तार |
महाराष्ट्र राज्य |
वर्ष |
2023 |
मिळणारा लाभ |
शासनाच्या विविध योजनांचा लाभ |
शासन निर्णय |
शासकीय योजनांची जत्रा शासन निर्णय :
राज्यातील
सर्व जिल्ह्यांमध्ये हे उपक्रम/ अभियान 15 एप्रिल 2023 ते 15 मे 2023 या कालावधीमध्ये
राबविण्यात येणार आहे या अभियानाचे जिल्हाधिकारी हे जिल्हाप्रमुख असतील इतर सर्व
विभाग त्यांच्या समन्वयाने काम करतील 15 एप्रिल 2023 ते 15 मे 2023 या कालावधीमध्ये नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती
देणे प्रस्तावित लाभार्थ्यांची यादी तयार करून लाभार्थ्यांकडून अर्ज भरून घेणे
अपेक्षित आहे या शासन निर्णयामुळे राज्यातील नागरिकांना योजनेचा लाभ घेण्यासाठी
नक्कीच मदत होणार आहे
No comments:
Post a Comment