Friday, April 28, 2023

Keyword KD Volume ↓ Updated whatsapp new feature | Whatsapp चं नवं फीचर, एक अकाऊंट चार फोनमध्ये वापरता येणार.........



नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – Whatsapp New Feature |  तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप एकावेळी एकाच फोनमध्ये वापरता येत होतं. फार तर एक फोन आणि लॅपटॉप मध्ये वापरता येत होतं. परंतु आता एकाच नंबरवरील व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट एकापेक्षा जास्त (Whatsapp New Feature) फोनमध्ये वापरता येणार आहे.आता तुम्ही एकापेक्षा जास्त फोनमध्ये एकाच नंबरने अकाउंट वापरू शकणार आहेत. फेसबुक (Facebook) आणि व्हॉट्सअ‍ॅपचे मालक मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे.

    कंपनीच्या माहितीनुसार, एक युजर आपल्या व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटला (Whatsapp New Feature)  चार वेगवेगळ्या स्मार्टफोनमध्ये (Smartphone) चालवू शकणार आहे. यावेळी सेकंडरी डिव्हाईसमध्ये व्हॉट्सअ‍ॅप सुरु करण्याकरता युजर्सना एक क्युआर कोड स्कॅन (QR Code Scan) करावा लागेल.यावेळी एक ओटीपी बेस्ड ऑथिंटिकेशन सिस्टमही (Based Authentication System) काम करणार आहे. 

    मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी एका ऑफिशियल ब्रॉडकस्टमध्ये या फीचरची घोषणा केली आहे. तर याचा सर्वाधिक वापर तेव्हा होईल, जेव्हा तुमच्या फोनची बॅटरी संपून फोन बंद पडत असेल त्याचवेळी मित्राच्या किंवा तुमच्या सोबत असणाऱ्या विश्वासू व्यक्तीच्या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप सुरु करु शकता.कंपनीने स्पष्ट केले आहे की, जरी वेगवेगळ्या डिव्हाईसमध्ये व्हॉट्सअ‍ॅप सुरु केलं, तरी सर्वात आधी असणाऱ्या प्रायमरी फोनमध्येच महत्त्वाच्या प्रक्रिया होतील. तसेच हा फोन डिस्ककनेक्ट झाला तरी इतरही फोनमधू व्हॉट्सअ‍ॅप गायब होईल. 

    सर्व चॅट हे एन्ड टू एन्ड इनक्रप्टेड असणार आहेत.दुसऱ्या फोनमध्ये कसं सुरु करायचं व्हॉट्सअ‍ॅप?

    सर्वात आधी ज्या फोनमध्ये तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप खात सुरु करायचं तो फोन ऑन करुन त्यात व्हॉट्सअ‍ॅप लॉगिन करा.

    त्यानंतर प्रायमरी फोनमध्ये लिंक्ड डिव्हाईस असा ऑप्शन येईल. त्यामध्ये तुमचे व्हॉट्सअ‍ॅप सुरु करु शकता.

Saturday, April 15, 2023

कुसुम सोलर योजना सुरू...........✅

 

S.C कॅटेगिरी साठी कुसुम सोलर योजना चालू झाली आहे सदर योजनेसाठी  7.5 एचपी चा कोटा शिल्लक आहे त्यासाठी पाच एकर पेक्षा जास्त क्षेत्र पाहिजे...✅

कुसुम योजना महाराष्ट्र 2023 चे वैशिष्ट्य काय?

  • पारेषण विरहित ३८१४ कृषी पंपाची महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यात स्थापना करण्यात येणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार आहे.
  • शेतकऱ्यांना स्वखर्चाने इतर उपकरणे या कृषी पंपाला लावता येतील.
  • सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांचे कृषिपंप किमतीच्या १० टक्के तर अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना ५ टक्के लाभार्थी हिस्सा घोषित केलेला आहे.
  • शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीनुसार ३ एचपी, ५ एचपी, ७.५ एचपी व त्यापेक्षा जास्त अश्‍वशक्ती एचपी डीसी सौर पंप अर्ज केल्यानंतर उपलब्ध होणार आहेत.

पंतप्रधान कुसुम योजना महाराष्ट्र 2023 लाभ –

  • शेतकऱ्यांना पंतप्रधान कुसुम योजनेचे लाभ खालीलप्रमाणे असणार आहेतः
  • शेतकर्‍यांना अखंडित वीजपुरवठा पुरवतो.
  • शेतकर्‍यांच्या शेती उर्जा अनुदानाचा भार कमी करते. 
  • भूजल अतिरेक तपासणीची क्षमता
  • शेतकर्‍यांना जोखीम-मुक्त उत्पन्न प्रदान करते. 
  • शेतीत कार्बन फूटप्रिंट कमी करण्यास मदत करते. 

महाडीबीटी फार्मर स्कीम माहिती 

कुसुम योजनेच्या अर्जासाठी आवश्यक पात्रता 

  • अर्जदार हा भारताचा कायम रहिवासी असावा.
  • सदर योजनेअंतर्गत, स्वयं-गुंतवणूकीद्वारे प्रकल्पासाठी कोणतीही आर्थिक पात्रता आवश्यक नाही.
  • अर्जदार त्याच्या जागेच्या प्रमाणात किंवा वितरण महामंडळाद्वारे अधिसूचित केलेल्या क्षमता (जे कमी असेल) च्या प्रमाणात २ मेगावॅट क्षमतेसाठी अर्ज करु शकतो.
  • सदर योजनेअंतर्गत शेतकरी ०.५ मेगावॅट ते २ मेगावॅट क्षमतेच्या सौर उर्जा प्रकल्पांसाठी अर्जदार अर्ज करु शकतात.
  • जर प्रकल्प विकसकामार्फत अर्जदाराद्वारे विकसित केला जात असेल, तर विकसकाची निव्वळ मालमत्ता प्रति मेगावॅट १ कोटी रुपये आहे.
  • प्रति मेगावॅट अंदाजे २ हेक्टर जमीन आवश्यक आहे.

online application 2023 मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना

कुसुम योजनेचे लाभार्थी –

  • शेतकरी
  • सहकारी संस्था
  • शेतकर्‍यांचा गट
  • जल ग्राहक संघटना
  • शेतकरी उत्पादक संस्था

कुसुम योजना महाराष्ट्र 2023 महत्वाची कागदपत्रे –

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • रेशन कार्ड
  • नोंदणी प्रत
  • प्राधिकरण पत्र
  • जमीन प्रत
  • चार्टर्ड अकाउंटंटद्वारे जारी केलेला नेटवर्थ प्रमाणपत्र (विकासकाद्वारे प्रकल्प विकसित करण्याच्या बाबतीत)
  • मोबाइल नंबर
  • बँक खाते विवरण

महाराष्ट्र राज्य कृषी GR माहिती 

कुसुम योजना अर्ज फी –

या योजनेंतर्गत अर्जदारास सौर उर्जा केंद्रासाठी अर्ज करण्यासाठी प्रति मेगावॅट ₹ ५००० आणि जीएसटीचा अर्ज भरावा लागेल. राजस्थान नूतनीकरणयोग्य ऊर्जा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या नावे डिमांड ड्राफ्टच्या रूपात ही देय रक्कम दिली जाईल. ०.५  मेगावॅट ते २ मेगावॅट पर्यंतच्या अर्जांचे अदा करावयाची शुल्क खालीलप्रमाणे असणार आहे. हि शुल्क म्हणजेच अर्जाची फी मेगावॅट नुसार आकारली जाणार आहे, ती खालील प्रमाणे असेल. 

  • ०.५ मेगावॅट साठी रु. २,५०० + जीएसटी
  • १ मेगावॅट रु. ५,००० + जीएसटी
  • १.५  मेगावॅट रु. ७,५०० + जीएसटी
  • २ मेगावॅट रु. १०,००० + जीएसटी

PM कुसुम योजना 2023 महत्वाची संकेतस्थळ –

  • ऑफिसियल वेबसाइट – mnre.gov.in
  • Online Apply PM कुसुम योजना 2022 वेबसाइट – mahaurja.com/meda/en/node
  • अर्ज नोंदणी (Online Apply) PM कुसुम योजना 2022 लिंक – https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B

जत्रा शासकीय योजनांची सर्वसामान्यांच्या विकासाची

 

          जत्रा शासकीय योजनांची सर्वसामान्यांच्या विकासाची या अभियाना अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये 75000 लाभार्थींना विविध योजनांचा लाभ दिला जाणार आहे शासन नागरिकांसाठी विविध योजना राबविते या योजनांची अंमलबजावणी करिता विविध दरवर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये आर्थिक तरतूद केली जाते. सदर योजनांची विविध स्तरावरती प्रसिद्ध केली जाते. परंतु नागरिकांना योजनेचा लाभ घेण्यासाठी शासकीय शासकीय कार्यालयामध्ये जावे लागते त्या ठिकाणी जाऊन माहिती घेणे त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे गोळा करणे जुळविणे तसेच सर्व कागदपत्रे कार्यालयात जमा करणे त्यामध्ये काही त्रुटी असल्यास ती दूर करणे यामध्ये वारंवार नागरिकांना कार्यालयांमध्ये जावे लागत , यामुळे योजनेचा उद्देश सफल होत नाही .

महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा प्रशासनाकडून व लोकप्रतिनिधींकडून यापूर्वी जामनेर चाळीसगाव मुरबाड व कल्याण ठिकाणी हे जत्र शासकीय योजनांची सर्वसामान्यांच्या विकासाची हे अभियान राबविले होते या उपक्रमामध्ये कमीत कमी कालावधीमध्ये नागरिकांना योजनेचा लाभ देण्यात आला आहे.

अभियानाचे नाव

जत्रा शासकीय योजनांची- सर्वसामान्यांच्या विकासाची

विस्तार

महाराष्ट्र राज्य

वर्ष

2023

मिळणारा लाभ

शासनाच्या विविध योजनांचा लाभ

शासन निर्णय

 PDF

 

शासकीय योजनांची जत्रा शासन निर्णय :

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हे उपक्रम/ अभियान 15 एप्रिल 2023 ते 15 मे 2023 या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे या अभियानाचे जिल्हाधिकारी हे जिल्हाप्रमुख असतील इतर सर्व विभाग त्यांच्या समन्वयाने काम करतील 15 एप्रिल 2023 ते 15 मे 2023 या कालावधीमध्ये नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देणे प्रस्तावित लाभार्थ्यांची यादी तयार करून लाभार्थ्यांकडून अर्ज भरून घेणे अपेक्षित आहे या शासन निर्णयामुळे राज्यातील नागरिकांना योजनेचा लाभ घेण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे

Monday, April 10, 2023

Weight gainer 100% Result

 There are several fast weight gain shakes available in India that can help you gain weight quickly. Here are some options:

  1. Endura Mass Weight Gainer: This is a popular weight gain supplement in India that contains high-quality proteins, carbohydrates, and essential nutrients. It comes in various flavors like chocolate, vanilla, and banana.

  2. Optimum Nutrition (ON) Serious Mass: This is another popular weight gain supplement that is rich in calories, proteins, and carbohydrates. It also contains vitamins and minerals that are essential for overall health.

  3. MuscleBlaze Mass Gainer: This is a high-calorie weight gain supplement that contains a blend of proteins, carbohydrates, and essential amino acids. It comes in various flavors like chocolate, vanilla, and strawberry.

  4. HealthKart Weight Gainer: This weight gain supplement is made from a blend of high-quality proteins, carbohydrates, and essential nutrients. It is available in different flavors like chocolate, vanilla, and mango.

It is important to note that weight gain supplements should be taken under the guidance of a nutritionist or a healthcare professional. They can recommend the right supplement and dosage based on your body type and fitness goals.

Aromatic Plants : भारतात १२ हजार सुगंधी वनस्पती; परंतु २५ वनस्पतींचाच व्यावसायिक कारणांसाठी उपयोग...

 सुगंधी वनस्पतींपासून मूल्यवर्धित पदार्थांची निर्मिती आणि व्यापार हा कृषी व्यापार क्षेत्रातील महत्त्वाचा घटक आहे. सुगंधी वनस्पतींच्या लागवड क्षेत्रात वाढ करणे गरजेचे आहे.



सुगंधी पदार्थांची निर्मिती आणि व्यापार हा कृषी क्षेत्रातील महत्त्वाचा घटक आहे. सुगंधी वनस्पतींपासून उत्पादने तयार करण्यासाठी सुगंधी वनस्पतींच्या लागवड क्षेत्रात वाढ करणे गरजेचे आहे.

महाराष्ट्रात सुगंधी वनस्पतींची लागवड व त्यापासून अर्क व तेल काढणे, अत्तर निर्मिती या उद्योगाला फार वाव आहे. भारतात सुमारे १२ हजार प्रकारच्या सुगंधी वनस्पती आढळून येतात. त्यातील फक्त २० ते २५ वनस्पतींचा वापर मूल्यवर्धित उत्पादन निर्मितीसाठी केला जातो.

गुलाब

गुलाब फुलाला फुलांचा राजा असे म्हणतात. रंग, सुगंध आणि आकार हे गुलाब फुलाचे मुख्य आकर्षण आहे. गुलाबापासून अत्तर, गुलाबपाणी, अर्क, गुलकंद अशी विविध उत्पादने तयार केली जातात.

अलीकडच्या काळात गुलाबापासून वाइन निर्मिती देखील होऊ लागली आहे. वेगवेगळी सौंदर्यप्रसाधने व खाद्य पदार्थांमध्येही गुलाबाचा उपयोग केला जातो.

गवती चहा

या वनस्पतींपासून तेल काढले जाते. त्याला देशात व परदेशात मोठी मागणी आहे. या तेलापासून महागडी परफ्युम तयार केली जातात. यात जीवनसत्त्व ‘अ’ भरपूर प्रमाणात असते.

वाळा

वाळा ही सुगंधी वनस्पती असून वाळ्याच्या मुळांपासून सुगंधी तेल काढले जाते. तेलाचा अत्तर, साबण, सौंदर्य प्रसाधने यामध्ये उपयोग केला जातो. उन्हाळ्याच्या दिवसांत पिण्याच्या पाण्यात वाळ्याच्या मुळ्या टाकल्यास पाणी नैसर्गिकरीत्या थंड होते. याची ठोंबापासून लागवड केली जाते.

मोगरा

मोगऱ्याच्या अर्काचा वापर अत्तर, साबण, सौंदर्य प्रसाधने यामध्ये केला जातो. चांगल्या सुगंधामुळे पुष्प सजावट, हार, वेणी, गजरा यासाठी उपयोग करतात. कलम करून लागवड करतात.

चंदन

चंदनाची विविध उत्पादने व सुगंधी पदार्थ बाजारात उपलब्ध आहेत. याशिवाय साबण, सौंदर्य प्रसाधने, स्वच्छता साहित्य, अगरबत्ती यामध्ये चंदनाचा उपयोग केला जातो. चंदनाच्या खोडाला बाजारात मोठी मागणी आहे. चंदनाची लागवड बियांपासून केली जाते.

निलगिरी

निलगिरी तेलाचा उपयोग अत्तर, सौंदर्य प्रसाधने व विविध औषधांमध्ये केला जातो. डासांना पळवून लावण्यासाठीही उपयोग होतो. वेगवेगळी मलम तयार करण्यासाठी देखील निलगिरीचा वापर केला जातो.

दवणा

या वनस्पतीपासून सुगंधी तेल काढली जाते. पानांचा वापर पुष्पहार निर्मितीसाठी होतो. कापडात दवण्याची फुले ठेवण्याची प्रथा आहे. यामुळे कपडे सुगंधी राहतात.विविध पेये तयार करण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग करतात. औषधांमध्ये उपयोग केला जातो. जलोदर, वांती, रक्तदोष, पोटसुळ यासाठी उपयोग करतात. लागवड कंदापासून केली जाते.

सिट्रोनेला

ही गवतवर्गीय वनस्पती असून यापासून सुगंधी तेले व अर्क काढले जाते. याचा उपयोग स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांच्या निर्मितीमध्ये केला जातो. सुगंधी साबण व तेल निर्मितीसाठीही उपयोग केला जातो. या वनस्पतीची लागवड ठोंबापासून करतात. सिट्रोनेला ही वनस्पती गवतीचहा सारखी दिसते.

फळांमधील औषधी गुणधर्म

आवळा

हे आंबट व तुरट फळ आहे. पित्त आजारावर गुणकारी आहे. स्वरभेदीसाठी आवळा कंठी चूर्ण गायीच्या दुधातून देतात. उचकी लागल्यावर आवळा रस मध व पिंपळी मिसळून दिली जाते. मोरावळा पित्तनाशक आहे.

त्रिफळा चूर्ण हे आवळा, हिरडा आणि बेहडा यांच्या मिश्रणापासून तयार केले जाते. त्रिफळा चूर्ण हे पोटाच्या सर्व विकारांवर उपयुक्त आहे.

फळांमधील औषधी गुणधर्म

जांभूळ

जांभूळ फळ मधुर आणि आम्ल असून मधुमेहात जांभळाच्या बियांचे चूर्ण देतात. या चुर्णामुळे यकृताची क्रिया सुधारते. अतिसार व आव यावर जांभूळाचा रस देतात. रक्ती आव, रक्तपदर यावरही जांभूळ उपयुक्त आहे. तोंड आल्यास, सालीच्या काढाच्या गुळण्या करतात.

पपई

पपई फळ त्वचा रोगनाशक आहे. पिकलेल्या पपईमध्ये अ, ब, क ही जीवनसत्त्वे असतात. पपईच्या कच्च्या फळाला चिरा पाडून निघालेला चीक गजकर्ण झालेल्या जागी लावल्यास गजकर्ण बरा होते. भूक वाढीसाठी पिकलेल्या पपईचे रोज सेवन करावे.

पक्व पपई खाल्यास शौचास साफ होते. पपईमध्ये जीवनसत्त्व अ मुबलक प्रमाणात असल्याने डोळ्यांचे आरोग्य राखण्यास उपयुक्त आहे. कच्च्या पपईपासून पेपेन तयार केले जाते.

केळी

केळी फळांमध्ये कर्बोदके, खनिजे व जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात. कावीळ लवकर बरी करण्यासाठी पिकलेले केळ एरंडाच्या पानांचा रस १० ग्रॅम प्रमाणे घ्यावे. रोज किमान २ ते ३ केळी खाल्यास शक्ती संचय होतो. सर्व मुत्रविकारांसाठी केळी सालीचा रस व गोमूत्र मिसळून दिले जाते.

पेरू

हे फळ थंड व मधुर आहे. जळवातावर पेरूच्या पानांचा उपयोग केला जातो. पेरूमध्ये असलेले जीवनसत्त्व क अनेक आजारांवर उपयुक्त आहे. जॅम, सॉस, सरबत बनविण्यासाठी पेरूचा वापर केला जातो. पेरूपासून उत्तम जेली तयार करता येते.

द्राक्ष

द्राक्ष हे स्निग्ध बलकारक आहे. याचा उपयोग आम्लपित्त, घशातील जळजळ, मंदाग्नी व आमवात यासाठी होतो. द्राक्षापासून मनुके तयार केले जातात. श्रमपरिहारासाठी मनुका उपयुक्त आहेत. बाळहिरडे व द्राक्ष एकत्र घेतल्यास सर्व विकारांवर उपयुक्त आहे.

चिक्कू

चिक्कू मधुर व पौष्टिक आहे. चिकूच्या दोन बिया पाण्यासोबत घेतल्यास लघवीच्या समस्या दूर होतात. लघवी अडचणी येत असल्यास चिकू बियांचे १ ते २ ग्रॅम चूर्ण दिले जाते. चिक्कू पित्तनाशक, पौष्टिक, ज्वर शामक आहे.

रेशीम उद्योग महाराष्ट्र 2023 Sericulture

     रेशीम उत्पादन हा शेतीला पूरक व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसाय व पोल्ट्री व्यवसायाप्रमाणेच हा व्यवसायही अत्यंत कमी खर्चात व शेतकऱ्यांना उपलब्ध साहित्याने करता येतो. नवीन तुती लागवड पद्धत आणि नवीन किट-पालन पद्धतीमुळे कमी श्रमात हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर शक्य होतो. घरातील लहान थोर व्यक्तींचा या व्यवसायात उपयोग होऊ शकतो. शेतकऱ्यांना कमीत कमी वेळेत महिनाभरात जास्तीत जास्त उत्पन्न मिळू शकते. सरकारने स्थिर वस्तूंच्या खरेदीसाठी निश्चित किंमतीची हमी दिली आहे. कोणत्याही चांगल्या निचऱ्याच्या जमिनीत तुतीची लागवड करता येते. या पट्टा पद्धतीने लागवड केल्यास तुती लागवडीतून पाल्याचे उत्पादन वाढते. पट्टा पद्धतीत खूप कमी पाणी लागते. एक एकर उसामध्ये 3 एकर तुतीची लागवड करता येते. एकदा लागवड केल्यावर तुती 15 वर्षांपर्यंत जगू शकत असल्याने, दरवर्षी लागवड करण्याची गरज नसते त्यामुळे लागवडीचा खर्च इतर पिकांइतका वारंवार होत नाही. एप्रिल, मे महिन्यात पाणी नसले तरी तुती मरत नाहीत. पाणी मिळाल्यानंतर तुती पुन्हा जोमाने वाढतात.

    आज शेतीमध्ये असे कोणतेही नगदी पीक नाही की जे, रेशीम कोकूनशिवाय अवघ्या 14 दिवसांत उत्पन्न देते. सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीशिवाय मासिक उत्पन्न मिळू शकते. तसेच रविवारसारख्या महिन्यात चार दिवस सुट्टीचा आनंद घेता येतो. इतर कृषी पिकांप्रमाणे, त्याचे संपूर्ण आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होत नाही. शेतकऱ्यांकडून कोष खरेदीची हमी शासनाने घेतली असून त्यांच्या सोयीसाठी आवश्यक ठिकाणी कोष खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. हा कोश शास्त्रोक्त पद्धतीने खरेदी केला जात असून त्याचा दर रु. 65/- ते रु.130/- प्रति किलो.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (POKRA) अंतर्गत फळबागा, वनीकरण, बांबू आणि तुती लागवडीला प्रोत्साहन दिले जाते. शेतकऱ्यांना हवामान बदलाशी जुळवून घेता यावे या उद्देशाने राबविण्यात येत असलेला हा प्रकल्प वातावरणातील कार्बन डायऑक्साइड स्थिर करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.

राज्य सरकारच्या माध्यमातून जागतिक बँकेच्या मदतीने विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव या 15 जिल्ह्यांमध्ये 'पोकरा' प्रकल्प राबविण्यात येत आहे. गावाच्या सीमेवर वृक्षारोपण आणि फळबागांची लागवड यासाठी खूप प्रभावी आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पारंपारिक शेती पद्धतीतील बदलांसह हवामान बदलास कारणीभूत ठरणाऱ्या कर्ब वायूंचे स्थिरीकरण आणि शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यास मदत होते. अवकाळी पाऊस आणि दुष्काळी परिस्थितीवर मात करून शेतकऱ्यांसाठी शाश्वत उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणे शक्य आहे.

रेशीम उद्योग महाराष्ट्र 2023 

योजनेचे नावरेशीम उद्योग महाराष्ट्र
व्दारा सुरुवातमहाराष्ट्र सरकार
राज्यमहाराष्ट्र
योजनेची तारीख2018-19
लाभार्थीराज्यतील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी
उद्देश्यरेशीम उद्योगाव्दारे राज्यातील शेतकऱ्यांना पूरक उत्पन्न मिळवून देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
अधिकृत वेबसाईटhttps://dbt.mahapocra.gov.in/
विभागकृषी विभाग महाराष्ट्र शासन
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
वर्ष2023
श्रेणीराज्य सरकार
अनुदानसर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना खर्चाच्या 75 टक्के व अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती करिता 90 टक्के अर्थ सहाय्य देय आहे.

रेशीम उद्योग लाभार्थी पात्रता निकष

रेशीम शेतीसाठी लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकरी ज्यांच्या कुटुंबात किमान एक व्यक्ती तुती लागवड आणि संगोपनासाठी उपलब्ध आहे, यामध्ये अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती आणि आदिवासी, दिव्यांग, महिला आणि त्याचप्रमाणे इतर पात्र शेतकरी या योजनेच्या अंतर्गत प्राधान्यक्रमानुसार पात्र आहेत.

  • या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांकडे अशा प्रकारची जमीन असावी जिथे पाण्याचा निचरा मोठ्याप्रमाणात किंवा मध्यम प्रमाणात होतो 
  • तसेच लाभार्थ्यांना ज्या जमिनीत किंवा शेतजमिनीत तुतीची लागवड करावयाची आहे, त्या क्षेत्रात सिंचनासाठी व्यवस्थित सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे.
  • या योजनेच्या अंतर्गत ज्या लाभार्थ्यांना किंवा शेतकऱ्यांना रेशीम उद्योग उभा करावयाचा आहे त्यांना या उद्योगा संबंधित म्हणजे रेशीम अळीचे संगोपन आणि लागवडी पूर्वी व नंतर, प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.
  • या योजनेच्या संदर्भात जर लाभार्थ्यांनी इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळविला असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • या योजनेच्या अंतर्गत एका परिवारातील एकाचा व्यक्तीला या योजनेच्या संबंधित फायदा देण्यात येणार आहे.
  • त्यानंतर हा उद्योग सुरु केल्यानंतर कमीत कमी तीन वर्षे करणे आवश्यक राहील.
  • रेशीम उद्योग महाराष्ट्र आर्थिक अनुदान 

    नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत रेशीम उद्योग या घटकासाठी दिलेल्या मापदांडानुसार सामान्य प्रवगातील लाभार्थींना 75% व अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती करता 90% अर्थ सहाय्य देण्यात येणार आहे.

    तपशीलएककमंजूर मापदांडानुसार खर्च (UNIT COST)प्रकल्प अर्थ सहाय्याचे प्रमाण (मंजूर मापदांडानुसार) सर्वसाधारण (75 %)प्रकल्प अर्थ सहाय्याचे प्रमाण (मंजूर मापदांडानुसार) अ.जाती / अ.जमाती (९0%)
    तुती रोपे तयार करण्यासाठी आर्थिक सहाय्यप्रती एकर1,50,000/-1,12,500/-1,35,000/-
    तुती लागवड विकास कार्यक्रमांतर्गत सहाय्यप्रती एकरrow2 col 337,500/-45,000/-
    दर्जेदार कोष उत्पादनासाठी - कीटकसंगोपन साहित्य/ शेती अवजारे साहित्य पुरवठा सहाय्य आधुनिक मांउटेज (Rotary Mountages( सहित)प्रती लाभार्थी75,000/-56,250/-67,500/-
    कीटकसंगोपन गृह बाांधणीसाठी सहाय्य प्रती लाभार्थीमॉडेल I (1000 चौ. फूट)1,68,639/1,26,479/-1,51,775/-
    मॉडेल II (600 चौ. फूट)95,197/-71,397/-85,677/-

    याव्यतिरिक्त बाल्य कीटकांच्या बागेची देखभालीसाठी मदत करणे, बाल कीटक संगोपन साहित्य  उपलब्ध करण्यासाठी मदत करणे (Chawki Rearing Centre), मल्टीएंड रिलिंग  मशीन (10 बेसीन) उभारणी, अॅटोमॅटिक रिलिंग मशीन (ARM) 200 एन्डस, रेशीम धाग्याला पीळ देणारे यंत्र (480 एन्डस) उभारणी, मास्टर रीलर्स आणि तंत्रज्ञ याांची सेवा पुरववणे इ. घटकांचा शेतकरी उत्पादक कंपनी/गटांना लाभ देता येईल. तुती लागवड, इतर साहित्य याबाबतचे तांत्रिक व आर्थिक मापदंड रेशीम संचालनालयाच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे असून त्यामध्ये झालेले बदल प्रकल्पासाठी लागू राहतील.

How to make paneer at home...

 To make paneer at home, you'll need the following ingredients and equipmen t: Ingredients: - 1 liter of milk (whole milk works best) - ...