Friday, April 28, 2023

Keyword KD Volume ↓ Updated whatsapp new feature | Whatsapp चं नवं फीचर, एक अकाऊंट चार फोनमध्ये वापरता येणार.........



नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – Whatsapp New Feature |  तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप एकावेळी एकाच फोनमध्ये वापरता येत होतं. फार तर एक फोन आणि लॅपटॉप मध्ये वापरता येत होतं. परंतु आता एकाच नंबरवरील व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट एकापेक्षा जास्त (Whatsapp New Feature) फोनमध्ये वापरता येणार आहे.आता तुम्ही एकापेक्षा जास्त फोनमध्ये एकाच नंबरने अकाउंट वापरू शकणार आहेत. फेसबुक (Facebook) आणि व्हॉट्सअ‍ॅपचे मालक मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे.

    कंपनीच्या माहितीनुसार, एक युजर आपल्या व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटला (Whatsapp New Feature)  चार वेगवेगळ्या स्मार्टफोनमध्ये (Smartphone) चालवू शकणार आहे. यावेळी सेकंडरी डिव्हाईसमध्ये व्हॉट्सअ‍ॅप सुरु करण्याकरता युजर्सना एक क्युआर कोड स्कॅन (QR Code Scan) करावा लागेल.यावेळी एक ओटीपी बेस्ड ऑथिंटिकेशन सिस्टमही (Based Authentication System) काम करणार आहे. 

    मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी एका ऑफिशियल ब्रॉडकस्टमध्ये या फीचरची घोषणा केली आहे. तर याचा सर्वाधिक वापर तेव्हा होईल, जेव्हा तुमच्या फोनची बॅटरी संपून फोन बंद पडत असेल त्याचवेळी मित्राच्या किंवा तुमच्या सोबत असणाऱ्या विश्वासू व्यक्तीच्या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप सुरु करु शकता.कंपनीने स्पष्ट केले आहे की, जरी वेगवेगळ्या डिव्हाईसमध्ये व्हॉट्सअ‍ॅप सुरु केलं, तरी सर्वात आधी असणाऱ्या प्रायमरी फोनमध्येच महत्त्वाच्या प्रक्रिया होतील. तसेच हा फोन डिस्ककनेक्ट झाला तरी इतरही फोनमधू व्हॉट्सअ‍ॅप गायब होईल. 

    सर्व चॅट हे एन्ड टू एन्ड इनक्रप्टेड असणार आहेत.दुसऱ्या फोनमध्ये कसं सुरु करायचं व्हॉट्सअ‍ॅप?

    सर्वात आधी ज्या फोनमध्ये तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप खात सुरु करायचं तो फोन ऑन करुन त्यात व्हॉट्सअ‍ॅप लॉगिन करा.

    त्यानंतर प्रायमरी फोनमध्ये लिंक्ड डिव्हाईस असा ऑप्शन येईल. त्यामध्ये तुमचे व्हॉट्सअ‍ॅप सुरु करु शकता.

No comments:

Post a Comment

How to make paneer at home...

 To make paneer at home, you'll need the following ingredients and equipmen t: Ingredients: - 1 liter of milk (whole milk works best) - ...